महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार – खा. धानोरकर
– पेट्रोल, डिझेल दरवाढीविरुध्द काँग्रेसचे आंदोलन
चंद्रपूर,
पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळपास आहे. गॅस सिलेंडर नऊशे झाला आहे. या महागाई वाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवार, 7 जून रोजी येथील आदर्श पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते.Advertisements
धानोरकर म्हणाले, आधीच जनता कोरोनाने त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर परिणाम झाला नाही. सामान्य माणसांना दिलासा देण्याचीच भूमिका घेतली होती. मात्र, आताचे केंद्र सरकार ते करू शकत नाही आहे, असा आरोपही त्यांनी लावला.
रामू तिवारी यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सुनीता लोढिया, प्रदीप डे, संतोष लहामगे, ललीता रेवल्लीवार, महिला शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष शालिनी भगत, प्रवीण पडवेकर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.