मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक

चंद्रपूर-

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या मुक्त भ्रमण करीत असताना त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणार्‍यास वनविभागाने वन गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अरविंद बंडा असे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

31 मे रोजी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ वनभ्रमण करीत होते. या मार्गावरून जाणार्‍या काही व्यक्तीने त्यांच्या भ्रमण मार्गात अडथळा निर्माण करून, त्याचे चित्रीकरण केले होते. याप्रकरणी वनविभागाने काही व्यक्तींना नोटीस बजावली होती. संबंधित आरोपी हा वाघाच्या अगदी 10 ते 15 मिटर अंतरावरून वाघाचे चित्रीकरण करीत असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. त्यावरून अरविंद बंडा यांच्याविरूद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला. त्यास अटक करण्यात आली.

ही कारवाई ताडोबाचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद, सहायक वनसंरक्षक बी. सी. येळे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. मून, क्षेत्र सहायक बी. जे. गजपूरे, वनरक्षक पी. ए. कोडापे, ए. डब्लू. गायकवाड, एस. आर. पेशट्टीवार यांनी केली.

About Vishwbharat

Check Also

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *