Breaking News

18 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मतदान नोंदणीचे काम करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी १८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर शहरातील कुंचल प्रशाला आणि त्र्यंबकेश्वर प्रशालेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदूणे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि १/ १ / २०२४ या अर्हता दिनांकावर मतदान यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यांत येत असून दिनांक २१ सप्टेंबर ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम पार पाडत आहेत. परंतु, काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक सदरचे काम करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी सदरचे काम करण्यांस नकार दिला त्यामुळे त्यांच्या विरुध्द निवडणुकीच्या कामात केलेल्या कसूरीस अनुसरुन लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कमल १३४ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार सदरबझार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणेत आले आहे.

मतदान केंद्र स्तरीय अधिकारी- सेवासदन प्रशाला २, नू म वि मराठी शाळा १, त्र्यंबकेश्वर विदयालय १, म न पा शाळा ३, सरस्वती तुमप्पा प्रशाला १, सोनामाता आदर्श विद्यालय १, सिध्देश्वर बालक मंदीर १, सोलापूर म न पा कर्मचारी ४ मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक- संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल- १, शहा कोठारी १,मुख्याध्यापक – त्र्यंबकेश्वर विद्यालय सोलापूर १, कुचन प्रशाला रविवार पेठ १ समावेश आहे.

About विश्व भारत

Check Also

जिलाधिकारी दफ्तर कें सहायक अधिकारी ने की ख़ुदकुशी : चिट्ठी में प्रेमिका को ठहराया जिम्मेदार

जिलाधिकारी दफ्तर कें सहायक अधिकारी ने की ख़ुदकुशी : चिट्ठी में प्रेमिका को ठहराया जिम्मेदार …

शंभर जणांचे बोगस ७/१२ तयार करणारे कोण? महसूल मंत्री बावनकुळे लक्ष देणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आदिवासी समाजासाठी सरकारची योजना आहे, तेव्हा तुमचे आधार कार्ड, दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *