नाशिक : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून हत्या केली होती.
शिक्षेचे स्वरूप
या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा पूर्वीच मृत्यू झाला. तर,यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उर्वरित उरलेल्या तिघांना 302 सह विविध कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मच्छिन्द्र सुरवडकर, राजू शिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम 302 अंतर्गत आजीवन करावास (जन्मठेप), 7 वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड सुनावला आहे.
विश्वभारत News Website