तिरुपती बालाजी : नेमकी किती संपत्ती?

विश्व भारत ऑनलाईन :

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.

तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. १९७४ ते २०१४ सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने ११३ मालमत्ता निकाली काढल्या आहेत. मात्र, २०१४ नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.

तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपूर के श्रीहरि नगर मानेवाड़ा में भव्य भागवत सप्ताह का समापन

नागपूर के श्रीहरि नगर मानेवाड़ा में भव्य भागवत सप्ताह का समापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

माता-पिता के चरणों मे समस्त तीर्थ और स्वर्ग विराजमान

माता-पिता के चरणों मे समस्त तीर्थ और स्वर्ग विराजमान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *