मटक्यात शिजणारे बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरातही

बिहारच्या मांसाहार डिश देशात लोकप्रिय आहे. याबद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला, तूप आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे.मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूरच्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे.

ओळख कुठून मिळाली?

चंपारण मटणाची सुरुवात प्रथम इंडो- नेपाळ बॉर्डरवर वसलेल्या घोराशन येथील गावांमध्ये झाली. त्यानंतर या डिशला खऱ्या अर्थानं लौकिक प्राप्त झाला तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात. या जिल्ह्याच्या नावावरूनच या डिशचेही नाव पडले चंपारण. हा मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहे तो त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मातीचे भांडे आणि पद्धतीमुळे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भांड्याला भोजपुरी भाषेत अहूना असे बोलल्या जातं. म्हणून याला आहूना मटण देखील म्हटले जाते.

चंपारण मटण कसे बनते?

मातीच्या भांड्यावर झाकण ठेवून त्यात खास बिहारी मसाला, लसूण, कांदा, मिरची, विशेष असे भाजलेले सरसोचे तेल टाकून झाकण कणीकने घट्ट बंद करून कोळसा अथवा लाकडाच्या कोळशावर शिजवले जाते. त्यानंतर ठरावीक कालावधीनंतर झाकणातून वाफ बाहेर काढण्यात येते. त्यानंतर 10-20 मिनिटे वाफ थंडी होऊन ही डिश तयार होते. विशेष बाब म्हणजे मटण शिजवताना पाण्याचा वापर केला जात नाही.

1400 रुपयात एक किलो मटण

चंपारण मटण हे पूर्णतः बिहारी पद्धतीने तयार होतं. या मटणाचा स्वाद पूर्णतः वेगळा असून ग्रेव्ही लटपटी आहे. या प्रकारचा मेनू फक्त चंपारण मटण हाऊस असलेल्या फ्रेंचायसीमध्येच खायला मिळतो. या डिशची किंमत 1600 रुपये पर किलो नुसार आहे. मात्र, आमचे मटण हाऊस नागपुरात नवीन असल्याने ऑफरमध्ये 1400 रुपयात दिले जात आहे. शॉप वासुदेव नगर मेट्रो स्टेशनच्या थोडं अलीकडे लेफ्ट साईटला आहे. वेळ दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत आहे, असे कळते.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *