Breaking News

नागपूर ‘पीडब्लूडी’चा प्रताप : शासकीय वसाहत दिली किरायाने

Advertisements

✍️मोहन कारेमोरे

Advertisements

‘पीडब्लूडी’ विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. आता नागपुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होईल. मात्र,’पीडब्लूडी’ विभागाने बेकायदेशीर कृती केल्याची बाब उजेडात आली आहे. शासकीय निवास सरकारी कर्मचाऱ्यांना न देता खासगी लोकांना दिल्याची माहिती आहे.

Advertisements

प्रकरण काय आहे?

नागपुरातील पीडब्लूडीच्या विभाग क्रमांक एकच्या अंतर्गत रविनगर शासकीय रहिवासी वसाहत आहे. तिथे शासकीय निवासी घरे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असतात. परंतु, मागील 3 वर्षांपासून 30 ते 40 घरे बाहेरील खासगी लोकांना बेकायदेशीररित्या देण्यात येत आहेत. तसेच अंदाजे 10 हजार किराया देखील घेण्यात येत आहे. हे काम उपअभियंता यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचे समजते. शासनाची फसवणूक करणाऱ्या उपअभियंत्यावर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी आहे.

सरकार लक्ष देणार काय?

पीडब्लूडी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष द्यावे. कारण शासनाची मालमत्ता पीडब्लूडीचे अधिकारी नियमबाह्य खासगी लोकांना देत आहे. याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.यावर कारवाई न झाल्यास अधिवेशनात आवाज उचलण्यात येईल, अशी माहिती नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *