धक्कादायक : खराब हवामानामुळे महाराष्ट्रात १९४ जणांचा मृत्यू

देशात खराब हवामानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह आणि महाराष्ट्र असा क्रमांक आहे. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे.

आकडेवारीनूसार, बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.गतवर्षी वादळ-वारे तसेच वीज पडल्याने सर्वाधिक १ हजार २८५ लोकांचा मृत्यू झाला. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या तुलनेत ५८% एवढे आहे. पुर तसेच अतिवृष्टीमुळे ८३५, बर्फवृष्टीमुळे ३७ तसेच उष्णतेच्या लाटेमुळे ३०, धूळीच्या वादळामुळे २२ लोकांना प्राण गमवावे लागले. वादळ-वारे तसेच वीज पडल्याने एकट्या बिहारमध्ये ४१५ लोकांचा मृत्यू झाला. तर,ओडिशात १६८, झारखंडमध्ये १२२, मध्य प्रदेशात ११६, उत्तर प्रदेशात ८१, राजस्थानमध्ये ७८, महाराष्ट्रात ६४ तर आसामध्ये ५८ नागरिकांचा मृत्यू झाला. एकंदरीत बिहार ४१८, आसाम २५७, उत्तर प्रदेश २०१ तसेच महाराष्ट्रात १९४ मृत्यूची नोंद घेण्यात आली.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *