Breaking News

नागपूर झेडपी सभापतीने शासकीय फर्निचर दिले आंदणात : राजकीय चर्चा

नागपूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींच्या सरकारी निवासस्थानांवरील फर्निचर गायब झाल्याची जोरदार चर्चा झाली. हा मुद्दा अलीकडे चांगलाच गाजला. यामुळे सत्तापक्ष अडचणीतही आला होता. सुरुवातीला हा मुद्दा लावून धरणाऱ्या विरोधीपक्षाला सर्वसाधारण सभेदरम्यान मात्र या मुद्दाचा विसर पडला. विरोधकांनी रागाच्या भरात सभात्याग केला आणि माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला. परंतु, यामुळे काहीजण दुखावल्याची चर्चा आहे.

फर्निचर कोणी नेले?

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चारही सभापतींना शासकीय निवासस्थान आहे. काही माजी सभापतींनी पदभार नव्यांकडे सोपविण्यापूर्वी निवासस्थानातील फर्निचर आपल्या घरी नेले. विरोधी पक्षनेते आतिश उमरे आणि शिवसेना (शिंदे गट) सदस्य संजय झाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. शासकीय फर्निचरही अपुरे पडत असल्याने त्यांची कामाच्या पद्धतीची जिल्हाभर चर्चा झाली. घरी नेलेले फर्निचर सभापतींनी परत आणून दिले. एका महिला सभापतींनी दुसरेच फर्निचर परत केले. आलेले फर्निचर व नेलेले फर्निचर यात तफावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.संबंधित सभापतींनी जवळच्या मंडळीला ते आंदणात दिल्याने दुसरे फर्निचर दिल्याची चर्चा रंगली.

प्रशासनाचा पत्रव्यवहार

फर्निचरची किंमत भरून देण्यासाठी प्रशासनाकडून पत्रव्यवहार करण्यात येणार होता. परंतु, याबाबत सत्तापक्षाकडून हे प्रकरण दडविण्याचा प्रयत्न झाला. सर्वसाधारण सभेत हा विषय विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित सभापतींकडून विषय न घेण्यासाठी अनेकांना फोन गेले. त्यांनी चूक मान्य करीत फर्निचरची रक्कम भरून देण्याची तयारी दर्शविली. प्रशासनालाही त्याबाबत कळविण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु, विरोधकांनी सभात्याग केल्याने सर्वसाधारण सभेत कोणतेही विषय आले नाही. तर या मुद्यावर पडदा टाकण्यासाठी विरोधकांकडून सभात्याग करण्याचीही चर्चा होत आहे.माजी सभापतींच्या कारभारावर अनेक जण नाराज होते. त्यामुळे हा विषय सभेत न आल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचीही चर्चा आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या प्रभारी विभागीय आयुक्त पदी डॉ. विपीन इटनकर!आज स्वीकारणार पदभार

अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर २१- सेंचुरी’ …

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *