Breaking News

बडनेऱ्यात महाप्रसादाच्या कार्यक्रमातून‎ 5 महिलांचे मंगळसूत्र चोरी

Advertisements

अमरावतीच्या बडनेरा येथील झीरी मंदीर परिसरात मॉ‎ कनकेश्वरी यांचे प्रवचन होते. प्रवचनानंतर‎ महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान‎ महाप्रसादाच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी‎ झाली. याच गर्दीचा फायदा घेवून एकाचवेळी‎ पाच महिलांच्या गळ्यातील ६८ ग्रॅम वजनाचे‎ मंगळसूत्र चोरीला गेले. ही चोरी करणाऱ्या चार‎ महिलांना तत्काळ नागरिकांनी पकडले. त्यांना‎ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना‎ रविवारी (दि. ५) सायंकाळी घडली.‎ वर्षा रविन्द्र घ्यार (४५, रा. बडनेरा) यांनी या‎ प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मागील‎ आठ दिवसांपासून झिरी मंदीर परिसरात मॉ‎ उनकेश्वरी यांचे प्रवचन सुरू होते. रविवारी‎ प्रवचन संपल्यानंतर त्याच ठिकाणी महाप्रसादाचे‎ आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

वर्धा येथील महिला

Advertisements

भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यातही‎ महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.‎ दरम्यान याच गर्दीचा फायदा घेवून वर्धा येथील‎ चार चोरट्या महिला त्या ठिकाणी शिरल्या. त्या‎ चौघींनी वर्षा घ्यार यांच्यासह पाच महिलांच्या‎ गळ्यातील अनुक्रमे १८ ग्रॅम, २ ग्रॅम, १० ग्रॅम, २०‎ ग्रॅम आणि १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरले.‎ घ्यार यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी‎ तत्काळ याबाबत ईतर महिलांना सांगितले‎ असता एकामागे एक पाच महिलांच्या‎ गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समोर‎ आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *