Breaking News

पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार

Advertisements

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेस पेढ्यात गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. त्यानंतर ते सार्वत्रिक करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजेंद्र जाधव (४०, रा.यवतमाळ) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली.

Advertisements

पीडित विवाहित ही पती व दोन मुलांसह अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत राहते. आरोपी विवाहितेच्या पतीचा चांगला मित्र असून तो घराशेजारी राहतो. जानेवारी महिन्यात पीडित विवाहिता घरी एकटीच असताना विजेंद्र तिच्या घरी आला. त्यानंतर त्याने प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. पेढा खाल्ल्यानंतर विवाहितेला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जाग आल्यानंतर आरोपी विजेंद्र हा घरातच बसून होता. यावेळी त्याने विवाहितेला तू मला खूप आवडते, तुझ्याशी संबंध ठेवायचे आहे, म्हणून तुझे फोटो काढले, असे तिला सांगितले. तसेच शारीरिक संबंध करू दिले नाही तर हे फोटो नवऱ्याला दाखवेन व सार्वत्रिक करेन, अशी धमकी देवून तो निघून गेला. त्यांनतर काही दिवसांनी विवाहिता ही घरी एकटीच असताना फोटो सार्वत्रिक करण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने अनेकदा विवाहितेवर अत्याचार केले.

Advertisements

२३ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती नसताना विजेंद्रने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेने आरडाओरडा केला व मुले जागी झाल्याने तो पसार झाला. बदनामी होईल या भीतीने पीडितेने आजपर्यंत तक्रार दिली नाही. मात्र, मंगळवारी तिने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *