Breaking News

नागपुरात नाना पटोलेंच्या निवासस्थानी सराफा व्यापाऱ्याचा गोंधळ

नागपुरातील एका कार्यक्रमासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेळ देऊनही आले नसल्याने या व्यापाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. पटोले यांच्या नागपुरातील घरी जाऊन व्यापाऱ्यांने गोंधळ घातला.

पटोले वचनाप्रमाणे कार्यक्रमाला येतील असा विचार करून आम्ही सर्व तयारी केल्याचं व्यापारी म्हणाला. आम्ही दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले, मात्र पटोले न आल्याने लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचं हा सराफा व्यापारी म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला न येणे हा केवळ आयोजकांचा नव्हे तर महाराजांचाही अपमान असल्याचं या सराफा व्यापाऱ्याने म्हटलं आहे. तर यावरून पटोले यांच्या स्वीय सहायकाने फसवणूक केल्याचा आरोप व्यापाऱ्यांने केला आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ: PM मोदी का कथन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ:PM मोदी का कथन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *