Breaking News

Maharashtra Unseasonal Rain | नंदुरबारमध्ये वादळी पावसाने बाजारपेठ उध्वस्त : जनावरांचाही मृत्यू

Advertisements

Maharashtra Unseasonal Rain विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्याने पीक व बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. नवापूर आणि नंदुरबार येथे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी झाडे कोसळले व घरांचे पत्रेही उडाले.

Advertisements




तळोदा अक्कलकुवा धडगाव आणि नंदुरबार या तालुक्यांमध्ये आज सोमवार 6 मार्च रोजी दुपारी तीन ते पाच वाजताच्या दरम्यान धुळीच्या वादळासह अचानक आलेल्या पावसाने मोठे थैमान घातले. Cloudy weather होळी सणानिमित्त नंदुरबार नवापूर तळोदा अक्कलकुवा धडगाव या प्रत्येक तालुक्यातालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बाजारपेठा सजलेल्या होत्या. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल घडत असते. परंतु आज ऐन होळीच्या दिवशी प्रचंड धुळीचे लोट आणि सोसाट्याचा वारा यामुळे एक ठिकाणच्या बाजारपेठा जवळपास उध्वस्त झाल्या. अवकाळी पावसामुळे मांडलेली दुकाने आवरताना आणि विक्रीचे सामान वाचवताना एकच धावपळ उडाली. #MumbaiRains #MumbaiWeather

Advertisements




वीजेने जनावरांचा मृत्यू

अक्कलकुवा तालुक्यातील प्रसिद्ध काठी येथील तसेच नंदुरबार मधील होलिकोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गारपीट झाल्याचे अद्याप माहिती नाही तथापि पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. नवापूर तालुक्यात वीज पडून एक म्हैस दगावली. नंदुरबार तालुक्यात कंढरे गावात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. Maharashtra Unseasonal Rain




Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *