असे म्हणतात की, जो भक्तीमध्ये दंग होतो तो दैवी शक्तीसमोर सर्व मोह माया विसरून जातो. उत्तर प्रदेशातील साहिर औरैया येथे राहणारे ध्रुवदास बाबा गेल्या तीस वर्षांपासून पायी तीर्थयात्रा करत आहेत. महाराजांनी देशभरातील मंदिरांना भेटी दिल्या आहेत. या महाराजांची एक डायरी आहे, ज्यामध्ये ते आपल्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब लिहितात, आज जाणून घेऊयात, संन्यासी बाबांचा प्रवास.
ध्रुवदास महाराजांच्या आईचे लहानपणीच निधन झाले होते, त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळू शकले नाही, म्हणून ते भगवंतावर प्रेम करू लागले. नंतर या वयात त्यांनी गुरुदक्षिणा घेत अयोध्येला निघून गेले. तेव्हापासून आजपर्यंत महाराजांनी आतापर्यंत घरदार सारं काही सोडून दिलंय. गेल्या तीस वर्षात धुवदास महाराजांनी देशातील सर्व मंदिरांना भेटी दिल्या, तीर्थयात्रा केली. त्यांचा आश्रम कुठेही बांधला नाही. जिथे मंदिर दिसले तिथे ते थांबतात.जेव्हा हा बाबा मध्यप्रदेशातील भिंड येथे पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या प्रवासाबाबतत एका न्यूज चॅनेलसोबत शेअर केला.
डायरी लिहितात…
पदयात्रेत ध्रुवदास महाराज जिथे जिथे थांबतात तिथे थांबण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा डायरीत नोंदवला जातो. इतकंच नाही तर खाण्या-पिण्याव्यतिरिक्त कुणी शिवीगाळ केली तर त्याचीही नोंद त्याच डायरीत असते. ते महाराज मंदिरात जातात आणि तीच डायरी देवासमोर ठेवतात. ज्याबद्दल त्यांनी चांगले लिहिले आहे, त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मागणी करतात, तसेच ज्यांच्याबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्याबद्दल त्याला सद्बुद्धी मिळो, अशा सदिच्छा ते व्यक्त करतात.
भिण्ड पासून खाटूश्याम पायी प्रवास –
ध्रुवदास महाराज भिंड येथून चालताना दिसत होते. महाराज सांगतात की इथून ते थेट खाटूश्याम पायी जातील. तिथून पायी चालत अयोध्या नगरीला जातील. अशा परिस्थितीत वाटेत जिथे मंदिर दिसेल तिथे ते थांबतात. कोणी जे काही खायला प्यायला देते ते तिथेच घेतात. न दिल्यास उपाशी राहतात. महाराज कधीही वाहनाने प्रवास करत नाहीत.
550 एकर शेतजमीन
ध्रुवदास महाराज यांचे वडील नारायणदास साहिर हे ओरैया येथील जमीनदारांच्या श्रेणीत गणले जातात. त्यांच्याकडे गावात चांगली जमीन आहे, साधू महाराज यांनी सांगितले की, आजही आमच्या कुटुंबाकडे 550 एकर (1100 बिघे) जमीन आहे. ही आमचे वडील करतात. पण मी सारे काही सोडून भगवंताच्या पूजेत मग्न झालो आहे. मोह माया कधीच आपल्या सोबत गेली नाही, फक्त सत्कर्मच आपल्या सोबत जातात, म्हणून आपण सर्व काही सोडून देवाच्या पूजेत मग्न आहोत, असे ते सांगतात.