Breaking News

गडकरींनंतर आता एका खासदाराला जीवे मारण्याची धमकी

Advertisements

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Advertisements

गडकरींना धमकी

Advertisements

राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनाही धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना त्यापूर्वी देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात नागपूर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *