चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल एक हजार चंदनाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही आग नैसर्गिक की मानवनिर्मित याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
मांगली देवतळे येथे जयंत नौकरकार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात चंदनाची सुमारे एक हजार तर इतर फळांची सुमारे ६०० झाडे लावली होती. दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडे जळाली. त्यासोबतच शेतात असणारी ठिबक सिंचन यंत्रणा देखील जळून खाक झाली. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा केला जात आहे.