✍️मोहन कारेमोरे
राज्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. ठाकरे आणि भाजप,शिंदे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे. तर राष्ट्रवादीचे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का?यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे असो किंवा अजित पवार यांच्यातील एकवाक्यता दिसत नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे.
काही दिवसांपासून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे टाळले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पुढील सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरविल्यास अजित पवार यांना संधी मिळू शकते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.