Breaking News

जोरदार पाऊस असताना टँकरने पाणी पुरवठा!वाचा कारण…!

Advertisements

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीला आलेल्या पुरात गाळाचे प्रमाण वाढून भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्याचे रोटेशन २४ ते ३६ तासांनी पुढे लोटले गेले. साडेपाच कोटी रुपये निधीतून पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्रातील १२ एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे नूतनीकरण झाले. तरीही शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली.

Advertisements

शहरातील अमृत योजना पूर्ण होईपर्यंत पालिकेने जीर्ण यंत्रणेचे पुनरुज्जीवन हाती घेतले. त्यात पहिल्या टप्प्यात १२ एमएलडी‎ क्षमतेच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले.‎ तरीही प्रश्न न सुटल्याने‎ शुक्रवारपासून रोटेशनवर परिणाम‎ झाला. यामुळे रोटेशननुसार गुरुवारी‎ सायंकाळी व शुक्रवारी दिवसभरात‎ पाणीपुरवठा न झालेल्या शहरातील‎ दक्षिण भागात पालिकेने १० टँकरद्वारे‎ पाणीपुरवठा केला. ३१ जुलैपर्यंत‎ टँकर सुरू राहतील, असे पालिकेने‎ स्पष्ट केले आहे. दुसरीकडे १०‎ एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे कामही‎ वेगाने सुरू आहे.‎

Advertisements

असा होणार पुरवठा

शहरातील उत्तर भागात शुक्रवारी, तर शनिवारी जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते थेट लोणारी हॉलपर्यंत दोन्ही बाजूंच्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रोटेशन बिघडल्याने हा पुरवठा आता शनिवार व रविवारी होईल. तर दक्षिण भागातील ज्या भागांना शुक्रवारी पाणी मिळते तेथे शनिवारी दिवसभरात कोणत्याही वेळी पाणी मिळेल. तर शनिवारी पुरवठा नियोजित असलेल्या भागांना रविवारी दिवसभरात पाणीपुर‌वठा होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *