Breaking News

राज्यपाल गावात मात्र जिल्हाधिकारी गैरहजर

राज्यपाल गावात आले की शिष्टाचार म्हणून स्थानिक खासदार व आमदार यांची स्वागतास हजेरी असतेच. जिल्हाधिकारी तर हमखास असतातच. वर्धा येथे मात्र तिघेही गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल रमेश बैस हे रोटरी क्लबच्या कार्यक्रमास सायंकाळी उशिरा पोहोचले. त्यावेळी खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर हे हजर नव्हते. खासदार तडस अन्य ठिकाणी एका कार्यक्रमात व्यस्त तर आमदार डॉ. भोयर हे नागपूर अधिवेशनात असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनीच राज्यपालांचे स्वागत केले.

रोटरी कार्यक्रमात बोलताना राज्यपाल बैस म्हणाले की, सामाजिक संस्थांचा हा जिल्हा आहे. रोटरीचे जगभर जाळे आहे. ही संस्था आपुलकीने कार्य करते. मुलींना सशक्त करण्यासाठी रोटरीसारख्या संस्थांची गरज आहे. यावेळी वर्धा जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रीती बजाज यांनी आईसह सन्मान स्वीकारला. मनोज मोहता यांनी आभार मानले.

About विश्व भारत

Check Also

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *