Oplus_131072

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार

 

*स्वच्छता दौडच्या होर्डिंगवरील अशोक चक्रावर झाडूच्या चित्राचे प्रदर्शन*

 

नागपूर, दिनांक – 22/09/2024

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धी करिता लावण्यात आलेल्या होर्डिंग वर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आले आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणी सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र लिहीत माहिती देऊन सदर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली वा राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ च्या कलम २ अन्वये महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

यावेळी बोलतांना राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राला महानगर पालिकेने पायदळी तुडवत असल्याचे होर्डिंग वर दाखविले आहे. यावरून देशाचे, राष्ट्रीय झेंड्याचे, राष्ट्रीय चिन्हाचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस प्रणित नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने केला असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.

 

भारताचा राष्ट्रध्वजावर सन्मानाने फडकणारा अशोक चक्रावरील २४ आऱ्यांवर भारतवासीयांच्या वेगवेगळ्या भावना व अधिकार दर्शवलेला आहे. याच पवित्र अशोक चक्राच्या चिन्हावर झाडूचे चिन्ह चिटकून नागपूर महानगर पालिकेला कोणता संदेश पोहोचवायचा आहे? असा देखील प्रश्न डॉ. राऊत यांनी वेळी उपस्थित केला.

 

महानगरपालिकेने अशोक चक्राला विद्रूप करून शहरातील लाखो नागरिकांसमोर प्रस्तुत केले. अशोक चक्राच्या विद्रूपीकरणामुळे देशावर प्रेम करणाऱ्यांच्या आणि एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि भडकावणारी चित्र होर्डिंग वर प्रदर्शीत करण्यात आली असून लाखो नागरिकांच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. यावरून मागील १५ वर्षापासून महानगरपालिकेची सत्ता भोगणारी भारतीय जनता पार्टीचे मनुवादी विचारधारेतील मनसुभे पुन्हा एकदा उघड झाले असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत. त्यांनी महापालिकेच्या या कारस्थानाचा तीव्र निषेध केला आहे.

 

*डॉ. राऊत यांना तरुणांनी दाखविले अशोक चक्रावरील झाडूचे चित्र*

 

आकाशवाणी चौकात सिग्नल वर डॉ. नितीन राऊत यांची गाडी थांबली असता काही तरुण त्यांच्याकडे आलेत व त्यांनी मनपाचे होर्डिंग वा मनपाद्वारे करण्यात आलेला अशोक चक्राच्या अवमान दाखविले.

महापालिके द्वारे आयोजित स्वच्छता दौड मध्ये मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, पोलीस उपायुक्त श्री. निमित गोयल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला परंतु यांनी अशोक चक्राच्या झालेला अवमान याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी विश्व भारतचे मुख्य संपादक मोहन कारेमोरे यांनी संपर्क केला. मात्र, जिल्हाधिकारी यांनी फोन उचलण्यास असमर्थता दाखविली.

————————————-

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला .तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच …

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *