Breaking News

अजितदादा रुपाली चाकणकरांनाच कशी ताकद देतात? सवाल

रूपाली चाकणकर यांना जशी तुम्ही ताकद देता तशी ताकत आम्हाला का देत नाही? असा खडा सवाल दीपक मानकर यांनी पक्षनेतृत्वाला केला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची घोषणा होण्याआधी रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी फेरनिवड करताय. त्यांना जशी ताकद देता, तशी ताकद आम्हाला देता येत नाही का? अशी विचारणा दीपक मानकर यांनी केली आहे.

पक्षसंघटनेच्या माध्यमातून आम्ही अजित पवार यांना ताकद देतो. राज्यातील कोणत्याही शहरात एवढी मोठी कमिटी नाहीये, जेवढी आमची कमिटी आहे. आमच्या कमिटीत १५०० लोक काम करतात. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताकद देणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, अशी आठवण मानकर यांनी अजित पवार यांना करून दिली आहे.

तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य रंगले आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपालनियुक्त आमदारपदी संधी न मिळाल्याने त्यांच्या ६०० समर्थकांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना पक्षातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

About विश्व भारत

Check Also

प्रकाश भालेराव यांची भाजपच्या ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता सेलच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

दिं- ४/१०/२५ शणीवार ला,* *माहाळ्गीनगर- बेसा रोड येथे दीपलक्ष्मी* *सभाग्रह येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा …

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *