Breaking News

विमानतळावर दोन विमानांची धडक : ३७९ प्रवाशी पेटले

जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर दोन विमान आमोरासमोर आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. विमानतळावरील कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. धावपट्टीवर धावत्या विमानाने पेट घेतल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. धावपट्टीवर तटरक्षक दलाचं विमान आणि प्रवासी विमानाची टक्कर होऊन आग लागली असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने म्हटलं आहे की, तातडीने या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

तटरक्षक दलाचं विमान आणि प्रवासी विमानाची टक्कर झाल्यानंतर जपान एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाने पेट घेतला. विमानाला आग लागली तेव्हा त्यात ३७९ लोक (प्रवासी आणि क्रू) होते. त्यानंतर विमान थांबवून सर्व प्रवाशांसह क्रूमधील सदस्य तसेच पायलट्सना सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या विमानाला लागलेली आग विझवण्याचं काम चालू आहे.

विमान उड्डाण करण्याआधी ही धडक झाली आणि विमानाने पेट घेतला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, विमानाच्या पुढच्या भागाला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बचावपथक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच विमानतळावर विमानाचे काही पेटते भाग पडल्याचं दिसत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल ७० हून अधिक गाड्या धावपट्टीवर दाखल झाल्या आहेत.

गेल्या चार दशकांमध्ये जपानध्ये अशी कोणतीही मोठी विमान दुर्घटना झालेली नाही. याआधी १९८५ मध्ये टोक्योहून ओसाकाला जाणाऱ्या JAL जंबो जेटचा मध्य गुनमा भागात अपघात झाला होता. या दुर्घटनेत ५२० प्रवासी मुत्यूमुखी पडले होते.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात पुन्हा विधानसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवाराने भरले लाखों पैसे

नागपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून …

विश्व हिंदू परिषद का बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार के खिलाफ दो दिवसीय प्रदर्शन

विश्व हिंदू परिषद का बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार के खिलाफ दो दिवसीय प्रदर्शन टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *