Breaking News

नागपूर : ZP महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळेंवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

टिप्परच्या धडकेत दोन भावंडाचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, पती रमेश लेकुरवाळे, कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या नेतृत्वात ३७ कार्यकर्त्यांनी टिप्परला आग लावली, अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली आणि बेकायदेशिररित्या गर्दी जमा करण्यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले.

२९ डिसेंबरला सकाळी बिडगावजवळ सायकलने जात असलेले सुमित नन्हेलाल सैनी (१५, रा. दुर्गानगर, पारडी) आणि बहिण अंजली सैनी (१८) यांना एका भरधाव टिप्परने धडक दिली. या धडकेत दोघेही भावंड जागीच ठार झाली. या घटनेनंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी अवंतिका लेकुरवाळे यांनी स्पिकर आणि माईकवरून नागरिकांना चिथावणी दिली. नागरिकांना टिप्पर जाळण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानावर दगडफेक करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. टिप्पर चालक बादशहा ठाकूर यालाही नागरिकांनी मारहाण केली होती.

वाठोडा पोलिसांनी हवालदार परसराम अतकरी यांच्या तक्रारीवरून अवंतिका लेकुरवाळे, आशीष मल्लेवार, पप्पू शाहू, जानकीप्रसाद ठाकरे, विक्की उर्फ नितीन चकोले, गौरव शाहू, गणेश दुप्पट, शुभम कूलरवाला, अतूल बालबुधे, स्वप्निल वासनिक, रमेश लेकुरवाळे, राजू यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

About विश्व भारत

Check Also

गडकरी,फडणवीसांच्या नागपूर आरटीओत वाढली लाचखोरी : अधिकारी-कर्मचारी…!

केंद्रिय भू- प्रष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार खुल्या मंचावरून आरटीओत उघडपणे भ्रष्टाचार होत …

नागपुर कें कस्तूरचंद पार्क के गुंबदों पर चढी भीड़ : शिकायत नहीं

नागपुर कें कस्तूरचंद पार्क के गुंबदों पर चढी भीड़ : शिकायत नहीं   टेकचंद्र शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *