Breaking News

नागपुरात १० लाखांची लाच घेतांना चार अधिकाऱ्यांना अटक

स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या नागपुरातील कारखाण्यात अलीकडेच स्फोट झाला होता. त्यात ९ कामगार मृत्यूमुखी पडले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर प्रकाशझोतात आलेल्या पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्ह ऑर्गनायझेशनच्या नागपूर स्थित मुख्यालयावर सीबीआयच्या चमूने छापा घातला.

राजस्थानच्या केमीकल कंपनीला अतिरिक्त डिटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या (पेसो) दोन उपमुख्य नियंत्रक अधिकारी, कंपनीचा संचालकासह सीबीआयने चौघांना अटक केली. अधिकाऱ्यांच्या घरझडतीत २.१५ कोटी रुपये सीबीआयने जप्त केले. अशोक दलेला आणि विवेक कुमार अशी अधिकाऱ्यांची तर देवीसिंह कच्छवा आणि प्रियदर्शन दिनकर देशपांडे असे अन्य दोघांची नावे आहेत.

पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशनचे (पेसो) देशातील मुख्य कार्यालय नागपुरात आहे. येथे मुख्य नियंत्रकासह उपमुख्य नियंत्रक दर्जाचे अधिकारी येथे कार्यरत आहेत. या कार्यालयातून देशभरातील स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्यांना परवाने दिले जातात तसेच कंपन्यांतील कार्य आणि उत्पादनावरही नियंत्रण ठेवले जाते. गेल्या काही वर्षांपासून पेसो कार्यालयातील काही अधिकारी स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्याना कारवाई करण्याची भीती घालून तसेच स्फोटक निर्मितीचे परवाने रद्द करण्याचा धाक दाखवून लाखो रुपयांची लाच घेत होते. याबाबत नागपूर सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली.

प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यूव अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याचे सेमीनरी हिल्समधील पेसो कार्यालयाजवळ झेरॉक्स सेंटर आहे. तो देशभरातील स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करून पेसो कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी लाचेच्या स्वरुपात पैसे गोळा करतो. राजस्थानमधील चितोडगढ येथे असलेल्या सुपर शिवशक्ती केमीकल कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स डिटोनेटर्सची अतिरिक्त निर्मिती करण्याची परवानगी हवी होती. उपमुख्य नियंत्रक अशोक दलेला आणि विवेक कुमार यांनी ती परवानगी देण्यासाठी कपंनीचे संचालक देवीसिंह कच्छवा (रा. भीलवाडा-राजस्थान) याला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. दोघांनीही दलाल प्रियदर्शन देशपांडे याची भेट घेऊन लाचेची रक्कम देण्यास

पाळत ठेवून केली कारवाई
देवीसिंह कच्छवा हा सोमवारी विमानाने नागपुरात आला. प्रियदर्शन देशपांडे याची भेट घेतली. कच्छवा आणि देशपांडे यांनी पेसोचे उपमुख्य नियंत्रक अशोक दलेला आणि विवेक कुमार यांच्यासोबत बैठक घेतली. १० लाख रुपयांच्या लाचेत परवानगी देण्याचा सौदा ठरला. देशपांडेने १० लाख रुपये रक्कम घेतली. या सर्व प्रकारावर सीबीआयने पाळत ठेवली. त्यानंतर चौघांनाही अटक केली. ही कारवाई सीबीआयचे उपमहानिरीक्षक एम.एस. खान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या ‘एम्स’मध्ये रुग्णासमोर डॉक्टरकडून मारहाण

नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) मेंदू शल्यक्रिया शास्त्र विभागातील वार्डात एका वरिष्ठ निवासी डॉक्टरने …

गडकरी,फडणवीसांच्या नागपूर आरटीओत वाढली लाचखोरी : अधिकारी-कर्मचारी…!

केंद्रिय भू- प्रष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार खुल्या मंचावरून आरटीओत उघडपणे भ्रष्टाचार होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *