Breaking News

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी घेतला कळमन्यात आढावा : नागपूर-रामटेक लोकसभा

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जुन रोजी नागपुरातील कळमना बाजार समितीत होणार आहे. मतमोजणीकरीता अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

 

४ जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबल १० अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी १२० टेबल व रामटेकसाठी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे.

राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.

About विश्व भारत

Check Also

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा कारमध्ये असल्याचे उघड : प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

सध्या गाजत असलेल्या नागपूरच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक महत्वाची माहिती उघड …

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *