Breaking News

काँग्रेस सत्ता स्थापन करणार : खरगे नवे पंतप्रधान?

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रीया दिली आहे. भाजपच उधळलेला वारू आम्ही रोखला आहे. त्याचा हा आनंद आहे. ही निवडणूक एका व्यक्ती विरोधात नव्हती तर त्याच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात होती,असे उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. तसेच काँग्रेस देशात सत्ता स्थापन करेल, असे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान उद्या बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला आपण जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या बैठकीत पुढील रणनिती आखली जाईल असेही ते म्हणाले. मात्र हे सांगत असताना इंडिया आघाडी सत्ता स्थापने बाबत काय भूमीका घेणार याविषयी त्यांनी मोठी बातमी दिली आहे.

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी दावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबतची पुढची भूमीका दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरवली जाणार आहे. दरम्यान तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी इंडिया आघाडीत यावे यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती ही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. चंद्राबाबू नायडूंना भाजपने त्रास दिला होता. तिच कृती नितीश कुमार यांच्याबरोबर केली होती. त्यामुळे भाजप आणि मोदींना त्रासलेले सर्वच जण इंडिया आघाडीत येतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या बैठकीला आपण जाणार आहे. त्याआधी संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे बैठकीला हजेरी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीचा नेता कोण असेल हे उद्याच्या बैठकीत ठरवले जाईल. छोट्या पक्षांनाही इंडिया आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

माझा पक्षा काढून घेतला. चिन्ह काढून घेतलं. पण मशालने चांगलीच आग लावली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पक्ष फोडणे लोकांना आवडलं नाही. सुडाचे राजकारण केले हे कोणालाही आवडले नाही असेही म्हणाले. मला त्रास दिला. शिव्या दिल्या पण मी लढलो आणि जिंकलो असेही ठाकरे म्हणाले. या निवडणुकीने असली कोण आणि नकली कोण हे दाखवून दिले आहे.

About विश्व भारत

Check Also

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *