वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही दुपारच्या सुमाराची आहे. गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे ही घटना घडली.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते.मात्र चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल, कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या.
या तिघींनी पाण्यात बुडत असतांना आरडा ओरड केली. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी लोक धावले. मात्र खोल पाण्यात असल्याने त्यांना पाण्याच्या बाहेर काढता आले नाही. त्यांच्याच बाजूला असलेल्या दोघींना वैनगंगा नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या तिन्ही बहिणी खोल पाण्यात गेल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही असे सांगण्यात येत आहे. या तिघींंचा युध्दपातळीवर शोध सुरू आहे. या तिघींचा शोध घेण्यासाठी या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच पोलीसांना माहिती दिली आहे.मोटर बोट देखील मागविली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी अख्ये मंडल कुटूंब वैनगंगा नदीच्या काठावर होते. त्यांच्याच डोळ्यादेखील ही दुर्देवी घटना घडली.
………………..
चंद्रपूर : राजुरा तालुक्यापासून जवळ असलेल्या चुनाळा येथील घराजवळील नागरिकांसोबत महाशिवरात्रीच्या पर्वावर वर्धा नदी येथे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तुषार शालिक आत्राम (१७) मंगेश बंडू चणकापुरे (२०) अनिकेत शंकर कोडापे (१८) वरील सर्व राहणार चुनाळा यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (दि. २६) दुपारी १ वाजता घडली आहे.
महाशिवरात्री निमित्त चुनाळा येथील काही नागरिक चुनाळा येथील वर्धा नदी घाटावर आंघोळ करण्यासाठी जात असता त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक आंघोळ करण्यासाठी गेले नदीपात्रात महिला एका बाजूला आंघोळ करीत असताना महिलापासून दूर काही अंतरावर जाऊन तिन्ही युवक आंघोळ करीत होते.
त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये बुडू लागले वेळेस त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला असता जवळ असलेला रामचंद्र रागी या युवकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांना मिळताच त्यांनी राजुरा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी राजुरा पोलिस पोहचली सदर घटना बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बल्लारपूर पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेऊ लागले. राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभाग चंद्रपूर येथे फोन करून बोटीची व्यवस्था केली व बोटीद्वारे मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत मृतदेह मृतदेह मिळाले नाही. मागील वर्षी याचा ठिकाणी चुनाळा येथील मासिरकर यांचा मुलगा बुडाला होता.
घटनास्थळी राजुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, बल्लारपूर पोलिस स्टेशनची टीम, राजुराचे नायब तहसीलदार किशोर तेलंग, आपत्ती व्यवस्थापन चंद्रपुरची टीम, चुनाळा ग्राम पंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलिस पाटील निमकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.