Breaking News

‘तुझा नवरा तुझ्यात रस का घेईल?’ : न्यायाधीशाची पत्नीवर अजब टिप्पणी

कुटुंब न्यायालयात पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. यावेळी न्यायाधीशांनी पत्नीवर केलेली टिप्पणी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. घटस्फोटात मध्यस्थी करताना न्यायालयाने पत्नीला उद्देशून म्हटले, “तू मंगळसूत्र घालत नाहीस, टिकली लावत नाहीस, अशाने तुझा नवरा तुझ्यात रस का घेईल?” पुण्यातील वकील अंकुर आर. जहागीरदार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सदर टिप्पणीची पोस्ट केली आहे. संबंधित जोडपे गेल्या काही दिवसांपासून वेगळे वेगळे राहत आहेत. तसेच त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी न्यायालयाने मध्यस्थी केली. न्यायाधीशांच्या या टिप्पणीवर आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

 

दरम्यान न्यायालयात सुनावणी सुरू असताना पत्नीने आरोप केला की, तिचा पती तिच्यामध्ये अजिबात रस दाखवत नाही. यावेळी न्यायालयाने सांगितले की, पत्नीने एका विवाहित महिलेप्रमाणे राहायला हवे.

 

वकील जहागीरदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मला व्यक्तिशः ही टिप्पणी बिलकुल आवडली नाही. पण ही टिप्पणी हिमनगाचे एक टोक आहे. जिल्हा न्यायालयात असे अनेक प्रकारची विधाने केली जातात. कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या व्यक्तीला या टिप्पण्या खटकू शकतात. मला वाटते, आपल्या समाजात अवमानास्पद गोष्टी सहन करण्याची सहिष्णूता आहे. पुरुषप्रधान संस्कृतीची हीच मोठी मेख आहे की, तुम्ही याबद्दल बोलू शकत नाही. दुर्दैवाने न्यायाधीशांनी केलेल्या अशाप्रकारच्या टिप्पण्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही.”

 

न्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी न्यायाधीशांच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध केला आहे. जिल्हास्तरीय न्यायाधीशांनाही आता सॉफ्ट स्किल्स आणि संवेदनशीलतेचे धडे दिले जावेत, अशी मागणी एका युजरने केली आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष …

नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस : महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कारणीभूत

अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *