राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून तडकाफडकी कार्यभार काढून घेण्यात आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. हा कार्यभार अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बोकारे हे गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर विद्यापीठाची सूत्रे बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांना राज्यपाल कार्यालयाकडून या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मात्र हा प्रभार तातडीने हस्तांतरित करण्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे अतिरिक्त प्रभार सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.