Breaking News

सैनिक कल्याण घोटाळ्याची चौकशी : मोहन कारेमोरे यांच्या तक्रारीनंतर सरकारला आली जाग

Advertisements

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील बुलडाणा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर व ठाणे या सात जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.

Advertisements

 

अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर सरकारने कार्यवाही केली आहे, हे विशेष. तरीही, राज्य सरकारने मोहन कारेमोरे यांचे नाव शासन निर्णयातून गायब केल्याचे दिसून आले आहे.

Advertisements

 

या चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त उपसंचालक (कोषागार) अशोक जोशी आहेत. त्यांच्यासह संजीव मुळे आणि गिरीश दयाळ हे सदस्य आहेत. समितीला २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात माजी सैनिकांचे मेळावे, साहित्य खरेदी, काही अधिकाऱ्यांनी दुहेरी महागाई भत्त्याचा घेतलेला लाभ, विशेष निधी, कल्याणकारी निधी व प्रोत्साहन निधीमधील कथित आर्थिक घोटाळ्यांची चौकशी होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’मधील कार्यकारी अभियंता साखरवाडेना निलंबित करा : प्रेतयात्रा काढून आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपांवरून …

उपजिल्हाधिकाऱ्याने केला वन जमीन घोटाळा : महसूल मंत्री बावनकुळे कोणती कारवाई करणार?

रायगड जिल्ह्यातील उरण येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल मुंडके यांनी बेकायदेशीरपणे वनांचे शेरे 7/12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *