Breaking News

नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे अडचणीत : लाच प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे लक्ष घालणार

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याची माहिती आहे. नरेश साधूरावजी बर्वे (वय ५४) असे अधिकाऱ्याचे नाव असून महसूल सहाय्यक म्हणून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. या घटनेनंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisements

 

आता नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे. महिरे यांचे हितसंबंध लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल आहे. महिरे यांचेही नाव लाच प्रकरणात होते, तरीही त्यांचा बचाव केला जात आहे. महसूल मंत्री बावनकुळे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisements

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शिवाजीनगर, महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी बर्वे यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर १७ आणि २० एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत बर्वे लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले.

 

यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नंदनवन परिसरात तक्रारदाराने पंचासमक्ष आरोपीला लाचेची रक्कम दिली. बर्वे यांनी पाच लाख रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीतून पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

 

विशेष म्हणजे, या रकमेत काही बनावट नोटांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

एक मई से हाथ में आएगी कम सैलरी?ओवरटाइम पर दोगुना पैसा

एक मई से हाथ में आएगी कम सैलरी?ओवरटाइम पर दोगुना पैसा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Fire Safety Week celebrated at Koradi Thermal Power Station

Fire Safety Week celebrated at Koradi Thermal Power Station   Techchandra Sanodia Shastri 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *