Breaking News

नागपुरात नाचताना धक्का लागल्याने खून : प्रेम प्रकरण

Advertisements

प्रेम प्रकरणातून संतापलेल्या तिघांनी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगरात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

Advertisements

जोहरान मुस्तफा शेख (१७) असे मृत मुलाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. कळमना पोलिसांकडून मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, जोहरान हा मंगळवारी रात्री नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी वाजपेयी नगरात अशरफी मस्जिद परिसरात आला होता. रात्री सुमारे अकराच्या सुमारास लग्नसमारंभात डीजेच्या तालावर नाचत असताना त्याचा एका तरुणाला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या अनुराग यादव या तरुणाने दोन साथीदारांना बोलावून जोहरानला बाजूला नेले. तिघांनी मिळून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच वेळी जोहरानचा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावला असता हल्लेखोरांनी त्यालाही मारहाण केली. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Advertisements

हल्ल्यानंतर आरोपी अनुराग यादव आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जोहरानला नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात नातेवाईकांचीही चौकशी सुरू केली आहे.

मद्यपींचा अंबाझरीतही प्राणघातक हल्ला

एकीकडे शहरात ही घटना घडत असताना मद्यप्राशन केल्यानंतर जेवणावरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून तिघांनी मित्रावरच प्राणघातक हल्ला चढवत त्याला जखमी केले. अंबाझरी पोलीस हद्दीतील पांढराबोडी येथे रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. विकास गडपायले मद्यपी मित्रांनीच प्राणघातक हल्ला केल्याने जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास हा पांढराबोडील्या चौकात मद्यप्राशन करत असताना तिघे तिथे आले. तेही मद्याच्या नशेत होते. मित्रांमध्ये जेवणावरून वाद झाला. त्यातून हमरीतुमरी झाल्याने तिघांनी विकासवर हल्ला करत पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी विकासला रुग्णालयात नेले. मात्र परिसरातील नागरिकांनी हल्लेखोरांची नावे सांगितल्यानंतरही अंबाझरी पोलिसांनी अभय दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महिला सिपाही से प्रेम का चक्कर मे 2 थानों के ड्राइवरों ने मारी गोली

महिला सिपाही से प्रेम का चक्कर मे 2 थानों के ड्राइवरों ने मारी गोली टेकचंद्र …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *