वाशिम : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ह्यगुगल फॉर्मह्ण आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री म्हणाले, लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कल जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘गुगल फॉर्म’वर युवक-युवतींनी आपल्याकडे असलेली कौशल्ये विषयक माहिती भरावी. त्याआधारे खासगी क्षेत्रात उपलब्ध संधीची माहिती त्यांना पुरविण्यात येईल. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इच्छूक जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराची क्षेत्रे, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, विविध शासकीय महामंडळाच्या योजना, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …