Breaking News

पालकमंत्री शंभूराज देसार्इंच्या हस्ते समुपदेशन कक्षाचे लोकार्पण

Advertisements

वाशिम : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ह्यगुगल फॉर्मह्ण आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.                                                                              जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.                                            पालकमंत्री म्हणाले, लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कल जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘गुगल फॉर्म’वर युवक-युवतींनी आपल्याकडे असलेली कौशल्ये विषयक माहिती भरावी. त्याआधारे खासगी क्षेत्रात उपलब्ध संधीची माहिती त्यांना पुरविण्यात येईल. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इच्छूक जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराची क्षेत्रे, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, विविध शासकीय महामंडळाच्या योजना, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *