राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मिशन बिगिन अगेनह्णमधील सवलती कायम ठेवत मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निबंर्धांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन [corona diesese lockdown] वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना शासनाने आज निर्गमित केली. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. व्यक्तिगत व्यायाम, दुकानांमधील खरेदी या बाबी संबंधित व्यक्तींच्या नजीकच्या परिसरात करता येतील. यासाठी सामाजिक अंतर,व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. कार्यालयीन कामकाजासाठी जाण्यायेण्यास प्रतिबंध राहणार नाही.                                                        कोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना अशा आहेत. मास्कचा वापर : सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.
सामाजिक अंतर पाळणे(सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी,दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये. जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील.विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 50 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील. मद्य, पान, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

About Vishwbharat

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *