वर्धा:प्रतिनिधी:- वर्धा,सेलू आणि देवळी तहसीलमधील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे एसडीओ सुरेश बगळे यांनी शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहे.या आदेशामध्ये दि.29 आणि 30 ऑगस्ट रोजी संचार बंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार संचारबंदीच्या काळामध्ये भाजीपाला , चिकन / मटन विक्री दुकाने , बेकरी कपडा मार्केट , किराणा हार्डवेअर / ऑटोमोबाईल सराफा बाजार , सलून , इलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स व इतर सर्व दुकाने पुर्णत: बंद राहतील.तसेच सर्व बँका फक्त कार्यालयीन कामकाजाकरीता सकाळी 11.00 ते सायंकाळी 04.00 पर्यंत सुरू राहतील.ग्राहकाच्या सोईसुविधाकरिता बँक सुविधा दोन दिवस बंद राहिल . सर्व औषधी दुकाने व दवाखाने 24 तास सुरू राहील . हॉटेलची काऊंटर वरून पार्सल सेवा सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत सुरू राहिल . आरोग्य विभागासंबंधातील सर्व दैनंदिन सर्वेक्षणाची कामे नियमीतपणे सुरू राहतील . दौनिक वर्तमान पत्र घरपोच सेवा सुरू राहतील . कृषी केंद्र सेवा नियमीतपणे सुरू राहतील . पेट्रोलपंप सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत सुरू राहतील . ( नॅशनल हायवे वरील पेट्रोल पंप त्यांचे नियमीत वेळे प्रमाणे सुरू राहतील . ) दुध विक्री सेवा सकाळी 05.00 ते 11.00 तसेच सायंकाळी 05.00 ते 08.00 पर्यंत सुरू राहतील . महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळ बस सेवा सुरू राहिल . । औद्यगिक आस्थापणा नियमीतपणे सुरू राहतील.औद्यगिक आस्थापणेचे कर्मचारी शक्यतो कंपणीच्या बससेवेचा उपयोग ये – जा करण्यासाठी करतील व स्व : ताचे ओळखपत्र जवळ बाळगतील.तसेच सदर संचारबंदी काळात संचारबंदीचा उल्लघन करणाऱ्यांवरती ( जसे 1.विनाकारण बाहेर फिरणे 2.मास्क चा वापर न करणे 3.सोशल डिस्टंसींग न पाळणे 4.बंद असतानाही आस्थपणा उघडी ठेवणे 5.गर्दी करणे ) जिल्हामध्ये लागू असलेल्या विविध कायद्यान्वये , कलमान्वये तसेच विविध आदेशान्वये सक्तीने कार्यवाही करण्यात येईल.असे आदेश सुरेश बगळे , उपविभागीय दंडाधिकारी तथा Incident Commander,श्री सुरेश बगळे वर्धा यांनी वरीलप्रमाणे आदेश आज दि .28 / 08 / 2020 रोजी काढले आहे.
हिंगणघाट ही राहणार बंद
हिंगणघाट मध्ये गेल्या काही दिवसात कोरोबाधित रुग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी श्री. चंद्रभान खंडाईत यांनी पुढील दोन दिवसाकरिता जनता कर्फ्युचा आदेश दिला आहे.29 व 30 ऑगस्ट रोजी नगर पालिका क्षेत्रात जनता कर्फ्युचे पालन करण्यात येणार आहे.वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात औषधी दुकान,दूध विक्री, उत्तपत्राचे वाटप,पार्सल सुविधा,घरपोच सुविधा,हॉटलमध्ये पार्सल सुविधा सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहील,वैद्यकीय कारणासाठी सर्व सुविधा सुरू राहतील तसेच या व्यतिरिक्त इतर सर्व प्रतिष्ठाने व कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, केवळ 2 जणांना गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी जाऊ दिले जाणार असून 4 जणांना सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी परवानगी देण्यात येणार आहे.