वर्धा : आर्वी :- महाराष्ट्रातील मंदीर सुरू करण्यासाठी विविध धार्मिक संस्थांनी २९ अॉगष्टला राज्यभर ‘घंटानाद आंदोलन’ नियोजित केले असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील श्री. क्षेत्र टाकरखेडा येथे कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करीत आंदोलन केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद वर्धा अध्यक्षा सरिता गाखरे, वैशाली येरावार उपाध्यक्षा जि. प. वर्धा, कांचन नांदुरकर जि.प.सदस्या, हनुमंत चरडे पं. स. सभापती,शोभा मनवर पं.स. उपसभापती, धर्मेद्र राऊत पं. स. सदस्य, भाजपा आर्वी तालुका अध्यक्ष प्रशांत वानखेडे, बाळा नांदूरकर, जयंत येरावार, देवीदास शिरपूरकर, सचिंद्र कदम, अश्विन शेंडे, रविन्द्र वाने, कुणाल कोल्हे यांच्या सहीत भारतीय जनता पक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांची उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्यासाठी यापूर्वीच परीपत्रक जारी केलेले असुन महाराष्ट्र वगळता देशातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खुप वेळा केली आहे. कोरोना संकटकाळातील सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पुजन, कीर्तन सुरू करावे हि सर्वांची मागणी असतांनाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण देवस्थाने व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी आमदार दादाराव केचे यांनी ‘ठाकरे सरकारला’ इशारा देण्यासाठी श्री. क्षेत्र टाकरखेडा येथील लहानुजी महाराज देवस्थानाच्या बंद प्रवेश व्दारा वर ‘घंटानाद’ करून ‘व्दार उघड उद्धवा व्दार उघड’ अशी हाक देत आंदोलन केले. आमदार दादाराव केचे यांनी महाविकास विकास आघाडीचे सरकार भ्रमित झालेले असुन कुंंभकर्णाच्या गाढ निर्देत असलेले सरकार असल्याने केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आखून दिलेल्या जनहितार्थ बाबी लागू करत नसल्याने जनतेला नाहक त्रास होत आहे. त्यामुळे जनतेच्या धार्मिक कार्य करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण देवस्थाने कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून जनतेसाठी उघडे करण्यात यावी अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली.