Breaking News

नौटंकी बंद करा…. माजी आमदार अमर काळे यांचा आमदार दादाराव केचे यांचेवर आरोप…

वर्धा :आर्वी :- तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या पिकांवर आलेल्या रोगांमुळे त्रस्त असताना आर्वी मतदार संघातील आमदार दादाराव केेचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात घेतलेल्या आढावा सभेला उपस्थित न राहता भूमिपूजन करण्यात व्यस्त होते असा आरोप  माजी आमदार अमर काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला…
सविस्तर वृत्त असे की दिनांक 28/08/2020 ला महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पिकांवर आलेल्या कीड व रोगांबाबत आढावा बैठक वर्धा येथे ठेवली होती.या बैठकीला मा.आमदार समीर कूनावार,मा.आमदार रणजित कांबळे हे उपस्थित होते मा.आमदार पंकज भोयर कोरोणा  positive असल्यामुळे  उपस्थित राहू शकले नाही,परंतु मा.आमदार दादारावजी केचे हे भूमिपूजन करण्यात व्यस्त होते  शेतकऱ्यांच्या ज्वलंत मुद्यावर प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित  राहले नाही कृषी मंत्र्यांची आढावा सभा असताना जनप्रतिनिधी त्या सभेला उपस्थित नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,भूमिपूजन पुढेही घेता आले असते किंव्हा कुणाच्याही हस्ते करता आले असते स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घ्यायचं त्यांच्या भरवशावर निवडून यायचं परंतु त्यांच्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्या आमदाराचा मी जाहीर  निषेध करतो .चार पाच शेतकर्याच्या शेतावर जाऊन फक्त फोटो काढुन शेतकर्यांबद्दल खूप कळवळा असल्याबाबत आमदार दादाराव केचे यांनी  नौटंकी बंद करावी अशे मत पत्रकार परिषदेत बोलताना अमर काळे यांनी व्यक्त केले.  शेतकऱ्यांन पुढे आलेल्या संकटाबाबत पालकमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याबाबत निवेदन दिल्याचे माहिती  माजी आमदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली…

आर्वीचे आमदार दादाराव केचे त्यांच्यावर अमर काळे यांनी केलेल्या टिकेवर आमदार केचे यांचा पलटवार

माजी आमदार अमर काळे यांच्या आरोपावर आमदार दादाराव केचे यांनी पलटवार केला.काळे गाढ झोपत असून त्यांना दुस-याने केलेले पाहवल्या जात नाही.त्यामुळे या सारखे राजकीय स्वार्थ साधून आरोप करीत आहे.२५ व २६ ऑगष्टला मतदार संघात कृषी, महसूल, पंचायत समितीच्या अधिका-यांसोबत घेऊन दौरा करण्यात आला.शेतक-यांच्या धु-यावर प्रत्यक्ष जाऊन सोयाबीनसह अन्य पिकांची पाहणी करण्यात आली.नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.नुकसानी संदर्भात आगामी अधिवेशनात लक्षवेधी पाठविण्यात आली आहे.शेतक-यांना प्रती एकर २५ हजार रूपये देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनासुद्धा निवेदन पाठविण्यात आले आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्य पार पाडीत आहे.मात्र काळे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात काय दिवे लावले हे सर्वश्रृतच आहे. दुस-याने केलेली चांगली कामे काळे यांच्या पोटात खुपत आहे.काळेंना शेतक-यांचा एवढा कळवळा कधीपासून आला. त्यांनी स्वत्: एकाही शेतात जाऊन पाहणी केली नाही.केवळ अंधारात बाण सोडत आहे.भूमिपूजन दौ-यात देखील शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणत शेतात जाऊन पाहणी केली.आपण काही केले नाही.दुस-याने केले ते पहावला जात नाही, अशी काळे यांची गत आहे.असे आर्वीचे आमदार दादाराव केचे त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *