Breaking News

८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Advertisements

वर्धा :- देवळी तालुक्यातील खर्डा येथे रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ८ वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

Advertisements

पीडित चिमुकली तिची सायकल आणण्यासाठी जात असताना आरोपी किरण शहारकर याने तिची वाट अडवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने नराधमाने तिला वीस रुपये देऊन कोणाला काही सांगायचे नाही असे म्हणून पळ काढला. चिमुकलीला वेदना असह्य होत असल्याने चिमुकली रडत रडत घरी आली.पीडित चिमुकलीचे कुटुंब रोजमजुरी करीत करतात. आईने विचारपूस केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ देवळी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. देवळी पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीविरूद्ध पोस्को कायदयातंर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला.  ठाणेदार नितीन लेव्हरकर,पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करीत आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

अधिकाऱ्यांनी केली जंगलात ६४० एकर जमीन खरेदी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात काय दडलंय?

सातारा जिल्ह्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी …

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में खेला? नकुलनाथ ने की चर्चा

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *