वर्धाःप्रतिनिधी::- वर्धा रेल्वेस्थानकावरील अस्तित्वात असलेल्या रेल्वे मालधक्क्याची वेळ यापूर्वी 24 तास अशी होती, यामुळे वर्धा परीसरातील वाहतुकदार, कामगार व मालधक्क्याशी निगडीत अनेकांना या वेळापत्रकामुळे त्रास सहन करावा लागत होता. कामगार आयुक्त कार्यालयाने देखील रात्री 10 नंतर कामगार उपलब्ध करुन देण्याकरिता असमर्थता दाखविल्याने वर्धा मालधक्क्यावर येणारे लोड अत्यंत कमी होऊन इतर मालधक्क्यावर वळते झाले होते. याचा परिणाम स्थानिक कामगारावर व अवलंबून असलेल्या व्यवसायीकांवर झाला असुन ‘‘ऐ’’ ग्रेड कॅटगीरी मध्ये वर्धा मालधक्का 24 तास वेळापत्रकामुळे ‘‘सी’’ ग्रेड कॅटगीरी मध्ये परीवर्तीत झाला होता. या घटनेची प्रलंबीत मागणीची दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. रामदास तडस यांनी रेल्वेमंत्री, रेल्वे महाप्रबंधक मध्य रेल्वे तसेच विभागीय रेल्वे प्रबंधक नागपूर यांच्याशी सतत पत्र व्यवहार करुन मालधक्क्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 करण्याची विनंती केली होती. या मागणीला दिनांक 24/08/2020 रोजी यश आले असुन रेल्वे मंत्रालयाने स्विकृती दिल्यानुसार वर्धा रेल्वे मालधक्क्याची वेळ सुधारीत करण्याची माहिती प्रसिध्दीपत्रकातुन दिली आहे.
या संबधात मध्य रेल्वे मुंबई येथून सविस्तर परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असुन वर्धा मालधक्क्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 करण्याच्या सुचना रेल्वे प्रशासनाने स्थानिक रेल्वे प्रशासनाला दिल्या असुन हा निर्णय तात्काळ अमलात आणण्याबाबत निर्देशीत केलेली आहे, यामुळे शेतक-यांचा युरिया व खते इतर मालधक्क्यावर न जाता आता थेट वर्धा स्टेशनवरील मालधक्कयावर येतील यामुळे वाहतुक खर्च व वेळेची बचत देखील मोठया प्रमाणात होईल याचा लाभ शेतक-यांला होईल व कामगारांना देखील नियमीतपणे रोजगार मिळेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी गुड्स गॅरेज व विविध कामगार संघटनेने खासदार रामदास तडस यांचे आभार व्यक्त केले