वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी:- दिवसें-दिवस कोरोना आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढतच आहे. ही स्थिती पाहता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दोन दिवस संचारबंदीची घोषणा केली आहे. यामुळे २९ व ३० ऑगस्ट रोजी वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहे.नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, संचारबंदीचे दरम्यान बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महसूल, पोलिस आणि नगर पालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.आज 29 ऑगस्ट रोजी संचारबंदी दरम्यान जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत होता यामध्ये बजाज चौक,शिवाजी महाराज पुतळा चौक,आर्वी नाका,धुनिवाले चौक,पावडे चौक शिसालिस्ट चौक इत्यादी ठिकाणी पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी विनाकारण फिरणारे नागरिकांवर तसेच माक्स न घालून असलेले नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती.तसेच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुद्धा दिसून येत होती.यावेळी सर्व मार्केट दुकाने आस्थापने बंद होती.

वर्धेत संचारबंदी काळात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, नियमाउल्लंघन करण्यावर कारवाई
Advertisements
Advertisements
Advertisements