वर्धा प्रतिनिधी :- राज्य शासनाने 15 सप्टेंबर पासुन 25 ऑक्टोंबर पर्यंत माझे कुटूंब माझी जबाबदारी हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे.दरम्यान आतापर्यंत जिल्हयातील 603 पथकामार्फत 25 हजार 415 गृहभेटी देऊन 92 हजार 690 व्यक्तीची तपासणी करून त्यांच्याशी आरोग्यासंदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत संवाद साधण्यात आला.
संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने ग्रासले असून भारतामध्ये सुद्धा या कोरोना विषाणू बाधिताची संख्या वाढत आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोना बाधिताची संख्या जास्त असल्यामुळे या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासाठी 15 सप्टेंबर पासुन राबविण्यात येत आहे. अभियाना दरम्यान आतापर्यंत जिल्हयातील 603 पथकामार्फत 25 हजार 415 गृहभेटी देऊन 92 हजार 690 व्यक्तींसोबत संवाद साधण्यात आला. संवादादरम्यान 124 व्यक्तींना सर्दी, ताप, अशी लक्षणे आढल्याचे निष्पन्न झाले. तसेच ऑक्सीजनची पातळी 95 टक्केपेक्षा कमी असलेले 25 व्यक्ती आढळून आलयात. सदर व्यक्तींना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
यामध्ये वर्धा तालुक्यात 136 पथकामार्फत 3 हजार 976 गृहभेटीत 15 हजार 986 व्यक्ती, सेलू 59 पथके, 3 हजार 390 गृहभेटीत 12 हजार 650 व्यक्ती, देवळी- 54 पथके 1 हजार 708 गृहभेटीत 4 हजार 604 व्यक्ती, आर्वी- 39 पथके 6 हजार 302 गृहभेटीत 23 हजार 709 व्यक्ती, आष्टी- 31 पथके 2 हजार 500 गृहभेटीत 10 हजार 965 व्यक्ती, कारंजा- 39 पथके 378 गृहभेटीत 1 हजार 554 व्यक्ती, समुद्रपूर- 49 पथके 1 हजार 658 गृहभेटीत 977 व्यक्ती व हिंगणघाट 32 पथके 5 हजार 503 गृहभेटीत 22 हजार 245 व्यक्तींशी संवाद साधण्यात आला.
पथके गृहभेटी दरम्यान भेट दिलेल्या घरांना स्टिकर लावत आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य ॲपची नोंदणी करण्यास सांगून ॲप कसे हाताळावे याची माहिती देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची आणि रक्तातली प्राणवायू मात्रेची नोंद करण्यात येते. घरातील सदस्यांना कर्करोग, अस्थमा, मधूमेह, किडनी यासारखे अति जोखमीचे आजार असल्यास त्याची नोंद घेण्यात येते. तसेच मास्क लावणे, वारंवार साबनाने हाथ धुणे, (नाक, तोंड व डोळे यांना वारंवार हात लावू नये) गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे इत्यादी माहिती देण्यात येत आहे.