Breaking News

वर्धा : क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसल्यास पशुपालकांनी काळजी घ्यावी : पशुसंवर्धन अधिकारी सौ.प्रज्ञा डायगव्हाणे

Advertisements

Ø गोचिडाद्वारे जनावरांमध्ये होते संक्रमण

Advertisements

Ø बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होतो संसर्ग

Advertisements

         वर्धा प्रतिनिधी :- ,दि 27:-  गुजरात राज्यातील बोताड व कच्छ याजिल्हयांमध्ये क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा(Crimean Congo Hemorrhagic Fever -CCHF) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा  म्हणजे जनावरांपासुन माणसांना होणारा रोग असुन जिल्ह्यातील पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पशु संवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे  यांनी केले आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव यापुर्वी

      कोंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झालेला आहे.हा रोग हा नैरो व्हायरस (Nairovirus ) या विषाणुमुळे होत असुन हे विषाणु मुख्यत्वेकरुन ह्यालोमा (Hyalomma) या जातीच्या गोचिडांव्दारे एका जनावरांपासुन दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासुन मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे पाळीव जनावरांमध्ये ( गाई, म्हशी, शेळया, मेंढया इ. ) तसेच ऑस्ट्रीच / शहामृग पक्ष्यांमध्ये सहसा रोगाची

कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत. तथापी अशी बाधित जनावरे / पक्षी या विषाणुंचे वाहक Carrier म्हणुन कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना (जसे जनावरांचे मालक, जनावराच्या संपर्कातील व्यक्ती,खाटीक, उपचार करणारे पशुवैद्यक व कर्मचारी ) या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे बाधितजनावरांचे मांस खाल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व किटकांच्या (गोचिड, पिसवा, डास इ.)दंशामुळे या रोगाचा मानवांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मानवांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसुन आले आहे व या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तींपैकी 30 टक्क्यांपर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार नझाल्यास मृत्यु पावण्याची शक्यता असते. या विषाणुजन्य रोगाविरुध्द प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाहय किटकांचे (Ectoparasites) उच्चाटन करणे ही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे.

आजाराची लक्षणे :

           या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सुरवातीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे, वगैरे लक्षणे दिसुन येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागाल लाल ठिपकेदिसु लागतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव (Subcutaneous Haemorrhage) नाकातुन रक्तस्त्राव,लघवीतुन रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसुन येतात. काही रुग्णांमध्ये कावीळी सारखी लक्षणे दिसतात. या रोगामध्ये मृत्युचे प्रमाणे 9 ते 30 टक्के इतके असु शकते.

संक्रमण कसे होते:

           सीसीएचएफ रोगाची लागण प्रमुख्याने ज्या व्यक्तिचा व्यावसायीक कारणामुळे संक्रमीत पशुंशी संपर्क येतो, अशाव्यक्तींना होण्याची शक्यता जास्त असते. उदा. पशुपालक किंवा पशुधन प्रक्षेत्रावर काम करणारे कामगार, पशुवैद्यकीयक्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि कत्तलखान्यात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, याशिवाय मानवी आरोग्य क्षेत्रात काम करण्या-या व्यक्तींना देखील या रोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो.

महाराष्ट्र राज्य गुजरात राज्याच्या लगत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्ता नाकारता येत नाही.दरम्यान राज्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आवश्यक आहेत.

 उपाय योजना करण्यात यावी :

  1. खबरदारीची उपाय योजना म्हणुन जनावरांवरील, शेळया – मेंढयांवरील व गोठयातील गोचिड आणि किटकांचेउच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बाहय किटकांचा (Ectoparasites) / गोचिडांचा नाशकरणाऱ्या औषधांची जनावरांवर तसेच गोठयामध्ये इतरत्र योग्य मात्रेत फवारणी करणे आवश्यक आहे. गोचिडांशीसंपर्क आल्याने होत असल्याने गोचिड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे. तसेच गोचिड चावणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी.
  2. त्याच प्रमाणे पशुवैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध असलेली बाहय किटक नाशक | औषधे प्राधान्याने जेथे जनावरांमध्ये गोचिड प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे अशा ठिकाणी वापरण्यात याव्यात.

3 सदरहु रोग पशुंचे कच्चे मांस खाल्ल्याने होवु शकतो त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवुन खावे.

  1. आजारी जनावरांवर उपचार करतांना वापरण्यात येणारी सामुग्री उदा. सुया, इंजेक्शन, सलाईन सेट्स प्लास्टीकबाटल्या इ. चे निर्जंतुकीकरण करुन योग्य रितीने विल्हेवाट लावावी.
  2. आजारी जनावरांवर उपचार करतांना पशुवैद्यकांनी हँडग्लोव्ज, मास्क, संरक्षक चष्मा इ. चा वापर करावा.

त्याच प्रमाणे शवविच्छेदन करत असतांना देखिल पशुवैद्यकांनी हँडग्लोव्ज, मास्क, संरक्षक चष्मा, पीपीई (PPE) चा वापर करावा. तसेच उपचार व शवविच्छेदन झाल्यावर जंतुनाशकांनी / साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

  1. जनावरांचे बाजार तसेच यात्रेच्या ठिकाणी विविध भागातील तसेच इतर राज्यातुन जनावरे येत असतात. अश्यावेळी व्यावसायीकांना योग्य ते मार्गदर्शन करावे आणि बाहेरुन आलेल्या अशा जनावरांची तपासणी करुन त्यांचेअंगावर गोचिडे असल्यास त्यांना कळपापासुन वेगळे करुन त्यांचेवर ताबडतोब प्रतिबंधक औषधे फवारणीकरण्यात यावी.
  2. गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गीर गाई, मेहसाना व जाफ्राबादी म्हशी तसेच शेळ्या,

मेंढ्या इ. जनावरे येत असतात. सीसीएचएफ (CCHF) हा आजारगुजरात राज्यातील कच्छ व बोताडजिल्ह्यांमध्ये नियंत्रणात येत नाही, तो पर्यंत गुजरात राज्यातील याजिल्ह्यांमधुन गाई, म्हशी तसेच शेळया- मेंढ्या खरेदी करणे किंवा सांभाळ करण्यासाठी / चारण्यासाठी आणणेसंयुक्तिक राहणार नाही.

  1. कत्तलखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांनी प्राण्यांच्या रक्त मांस अथवा इतर द्रवाशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पायात गम बुट्स घालणे,हातामध्ये ग्लोज घालणे व चेहऱ्यावर मास्क बांधणे किंवा पूर्ण शरीरभर संरक्षक कपडयांचा वापर करणेअत्यावश्यक आहे. अशा प्रकारची दक्षताखाटीक तसेच कत्तलखाना व्यावसायीकांनी घ्यावी
  2. कत्तलखान्यात स्वच्छता राखणे तसेच टाकावु प्राणिजन्य पदार्थांची योग्य विल्हेवाट लावणे हे देखील अतिशयमहत्त्वाचे आहे.
  3. जनावरांच्या संपर्कात येत असणाऱ्या व्यक्ती उदा. शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी देखील योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींमध्ये आजारपणाची लक्षणे जसे ताप येणे, अंग दुखणे,अंगावर चट्टे येणे, सांधे दुखणे, उलटी होणे या सारखी लक्षणे दिसुन आल्यास त्याची माहिती ताबडतोब नजिकच्या आरोग्य विभागास देण्यात यावी व आवश्यक ते उपचार करुन घ्यावेत. तसेच रोग अन्वेषण विभागास ही याबाबत कळविण्यात यावे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *