चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी
* भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड
* दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
चंद्रपूर-
मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली.
दरम्यान, दारूबंदी असलेल्या चंद्रपूर महानगरात नागपूर मार्गे मुंबई येथून ब्राऊन शुगरची आयात केली जात असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली असून, तशी कबुली अटकेतील आरोपींनी दिली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून, त्यांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी दिली. भिवापूर वॉर्डातील भंगाराम चौक निवासी आरोपी आवेश कुरेशी यांच्या घरी विक्रीसाठी ब्राऊन शुगरचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीच्या घरी धाड टाकली गेली. या धाडीत ब्राऊन शुगरचा गर्द पावडर 42.340 ग्रॅम जप्त करण्यात आले. तसेच घर झडतीत या विक्रीतून जमा झालेले 1 लाख 36 हजार 460 रूपये, भ्रमणध्वनी असा एकूण 2 लाख 1 हजार 460 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने नैनेश ऊर्फ नितेश शहा याच्याकडून ब्राऊन शुगर घेत असून, आम्ही दोघेही हेच काम करीत असल्याची कबुली त्याने दिली. आरोपींच्या बयाणावरून शहा यास ताब्यात घेण्यात आले. दोघांचीही झडती घेतली असता, त्यांनी हा ब्राऊन शुगर नागपूर व्हाया मुंबई येथून आल्याची माहिती दिली. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक निलेश वाघमारे, विजय कोरडे, बाबा डोमकावळे, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, पांडूरंग वाघमोडे आदींनी केली.
Check Also
नागपुरातील बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण!
कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच आता ‘स्त्री २’ फेम अभिनेता मुश्ताक खान याचंही …
भिलाई का ट्रांसपोर्टर महाराष्ट्र पुलिस की रडार में : देर रात छापेमारी
भिलाई का ट्रांसपोर्टर महाराष्ट्र पुलिस की रडार में, देर रात छापेमारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …