Breaking News

माणिकगड सिमेंटचे डस्ट प्रदुषण १५ दिवसात बंद करा,अन्यथा आंदोलन.

माणिकगड सिमेंटचे डस्ट प्रदुषण १५ दिवसात बंद करा,अन्यथा आंदोलन.
(भाजप नगरसेवक डोहेंचा प्रदुषण नियंत्रण मंडळाला इशारा!)
कोरपना(ता.प्र.):-
     चंद्रपूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात असलेली “माणिकगड सिमेंट कंपनी” नेहमी नाना कारणांमुळे चर्चेस पात्र ठरलेली आहे.ज्या शहरात सदर कंपनी उभी करून कोट्यवधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे दीसत आहे.इतर बाबींना दुर्लक्ष केले तरी मुख्यतः या कंपनीतून सतत सैरावैरा सुटणार्‍या डस्टमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहे.यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.याच्या उपाययोजनेसाठी वारंवार जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह खालपासून वरपर्यंत तक्रारी केल्या मात्र कारवाई शून्य दिसत असून जसजश्या तक्रारी केल्या जात आहे तसतश्या कंपनीकडून पुन्हा जोमाने डस्टचा मारा सुरू आहे.डस्टच्या समस्याने अख्खे शहरवासी त्रस्त असून तथाकथित समाजसेवक व जनतेचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र याविषयी चकार शब्दही काढायला तयार नाही हे मात्र विशेष.
        असे असताना येथील प्रभाग क्रमांक २ साईशांती नगरीच्या रहिवासीयांनी मात्र डस्ट संदर्भात कंपनी विरोधात याच प्रभागातील भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात कमालीचा बंड पुकारल्याचे पहायला मिळत आहे.मागील अंदाजे एकवर्षा पासून डस्टचा वर्षाव सुरू असल्याने सदर नगरीतील रहिवासीयांचे अक्षरशः जगणे कठीण होऊन बसले आहे. संबंधितांकडे अनेक तक्रारी करूनही काहीच निष्पन्न होत नसल्याचे पाहून अखेर यांनी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या १० ते १५ दिवसात जरका डस्ट प्रदुषण विषयी समाधानकारक कारवाई केली नाही तर कंपनी गेट समोर रस्ता रोको आंदोलन करून वाहतूक बंद करू असा इशारा नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदनातून दिला आहे. मागील दीड महिन्यापूर्वी न.प.कडे कंपनीच्या डस्ट बाबत ठराव घेण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे नगराध्यक्षा व सत्ताधारी दुर्हक्ष करीत ठराव घेत नाही आहे.तसेच कंपनी व्यवस्थापकाला सुद्धा डस्ट बद्दल उपाययोजना करण्याची मागणी केली.मात्र व्यवस्थापक “हा डस्ट कंपनीचा नाही,रोडचा आहे” अशाप्रमाणे बेजबाबदार वक्तव्य करून हात झटकत असल्याचे आरोप नगरसेवक डोहे यांनी केला आहे.येत्या १५ दिवसाच्या आत डसट प्रदूषण बंद न झाल्यास कंपनी गेट समोर रस्ता रोको आंदोलन करत कंपनीची वाहतूक अडविण्याचा इशारा क्षेत्राधिकारी(फिल्ड आँफीसर)भादूले यांच्या मार्फत प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना देण्यात आला आहे.सोबतच जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर संबंधितांनाही निवेदन दिल्याची माहिती देत,निर्धारित दिवसात जर डस्टची समस्या मार्गी लागली नाही तर दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे आंदोलन उभारणार असल्याचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी “दै.चंद्रधून” ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

About Vishwbharat

Check Also

वाघ पाहण्याची उत्सुकता अन् पोलिसांचा लाठीचार्ज

किटाडी ते मांगली (बांध) या रस्त्यावरील शेतशिवारातलगत किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी …

भंडारा वन विभागाकडून शेकडो झाडांची कत्तल

मागील चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला, एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *