नागपुरातील कोराडी वसाहतीत बिबट्याला जे्रबंद केल्याने नागरिकांना दिलासा
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
नागपुर जिल्हाचे कोराडी विधुत वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेमुळे वसाहतीतील रहिवासी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत होते. परंतु सुरक्षा विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा बिबट्या अखेर पकडण्यात आला.
कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मा. श्री विलास मोटघरे साहेब (मुख्य अभियंता) आणि श्री कासुलवार साहेब (उपमुख्य अभियंता) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री देवेंद्र राठोड (वरिष्ठ व्यवस्थापक, सुरक्षा), श्री नवीन कुमार सतीवाले (उप वरिष्ठ व्यवस्थापक, सुरक्षा), श्री प्रफुल्ल उमरकर (उपव्यवस्थापक, सुरक्षा), आणि त्यांची सुरक्षा टीम यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास सी-टाईप बिल्डिंग 3 च्या परिसरात बिबट्या आढळल्याची खात्री झाल्यानंतर वनविभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानुसार, सी टाईप परिसरात बिबट्याला जेल बंद करण्याकरिता झाडाझुडपात वनविभागाच्या मदतीने पिंजरा लावून सापळा रचण्यात आला. चोख सुरक्षा ठेवून पिंजऱ्यावरती पाळत ठेवण्यात आली रात्री 11 वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सदरील बिबट्या वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेने वसाहतीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुरक्षा विभाग आणि वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे वसाहतीत आता सुरक्षिततेचा भाव निर्माण झाला आहे. रहिवाशांनी स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.