Breaking News
Oplus_131072

चंद्रपूर आणि ‘पुष्पा’ चित्रपटातील लाल चंदनाचे झाड

“पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही, फायर है मै”, हा पुष्पा चित्रपटातील डायलॉय सध्या सर्वत्र गाजत आहे. त्याला कारण दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याचा सुपरहिट पुष्पा चित्रपटाचा पुढचा भाग पुष्पा २ हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. लाल चंदनाच्या तस्करीवर हा चित्रपट आधारीत आहे. अतिशय महाग असलेले लाल चंदनाचे झाड हे जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देखील आहे. एक नाही तर अशी तीन झाडे ताडोबा प्रकल्पात आहेत.

 

पुष्पा चित्रपटापासूनच लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या लाल चंदनाच्या अनेक रंजक कथाही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या लाल चंदनाला अधिकच महत्व प्राप्त झाले. या लाल चंदनाची किंमत कोट्यावधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.

 

आता हेच लाल चंदन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात देखील असल्याची माहिती माेहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली. ताडोबातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाचे विश्रामगृह परिसरातच लाल चंदनाचे हे झाड उभे आहे. सध्या या लाल चंदनाला अतिशय मागणी असल्याची माहितीही थिपे यांनी दिली. लाल चंदनाची एकूण तीन झाडे येथे आहेत. या तिन्ही झाडांची आम्ही योग्य पद्धतीने निगा राखतो अशीही माहिती थिपे यांनी दिली. पुष्पा चित्रपटापासून लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात असले तरी ताडोबात बऱ्याच वर्षांपासून लाल चंदनाचे झाड आहे. बऱ्याच लोकांना या झाडाबद्दल पुरेशी कल्पना नाही. अनेकांना तर ताडोबात देखील लाल चंदनाचे झाड आहे याचीही माहिती नाही.

मात्र बऱ्याच वर्षापासून हे झाड ताडोबात बहरते आहे. या झाडाची विशेष निगा राखण्यासाठी म्हणून तिथे एक चबुतरा केला आहे तसेच झाडावर त्याचे नाव देखील लिहिले आहे. ताडोबाच्या जंगलात येणारे पर्यटक तसेच वन्यजीव अभ्यासक ताडोबा प्रकल्पात देखील लाल चंदन आहे काय अशी विचारणा करतात, तसेच ताडोबात येणारा पर्यटक हा लाल चंदनाचे झाड बघूनच ताडोबा प्रकल्पाच्या बाहेर पडतो. ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे तसेच आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे. पुष्पा चित्रपटानंतर आता या झाडाला बघणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

About विश्व भारत

Check Also

गरोदर असताना घट्ट कपडे घालायला लावले : वेदना होत असूनही…!

राधिका आपटे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. …

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *