वरोरा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा संपन्न
वरोरा-
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा 15 जून 2021 ला तहसीलदार प्रशांत बेडसें पाटील यांच्या दालनात संपन्न झाली.
सभा सुरू होण्यापूर्वी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य स्व .विजेंद्र बापुराव नन्नावरे यांचे कोरोनाने दुःखद निधन झाल्याबद्दल तहसीलदार प्रशांत बेडसें पाटील यांनी शोक प्रस्ताव सादर केला.व त्यावर सर्व सभासदांनी दिवंगत सदस्याना श्रदांजली अर्पण केली.
समिती सभेमध्ये एकूण प्राप्त आनलाइन 331 लाभार्थ्यांच्या प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली.
यामध्ये संजय गांधी निराधार योजना-एकूण प्राप्त प्रकरणे 60,पात्र प्रकरणे 58,अपात्र-2 ,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना-प्राप्त प्रकरणे 137 ,पात्र प्रकरणे 135, अपात्र 2 ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना पात्र प्रकरणे 98, पात्र प्रकरणे 95 अपात्र 3 ,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना प्राप्त प्रकरणे 18 ,पात्र प्रकरणे 18 ,अपात्र 0 ,इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना प्राप्त प्रकरणे 1 , पात्र प्रकरणे 1, अपात्र प्रकरणे 0 ,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना प्राप्त प्रकरणे 17,पात्र प्रकरणे 16 ,अपात्र प्रकरणे 1 एकूण प्राप्त प्रकरणे 331 ,पात्र प्रकरणे 323 ,अपात्र प्रकरणे 8 आहेत.
सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मिलिंद मनोहरराव भोयर यांनी शासनाने कोरोना कालावधीतील माहे मे चे अनुदान एक महिना अगोदर जमा करण्याबाबत कळविले असून अजूनही काही लाभार्थ्याचे अनुदान वेळेवर जमा होत नसल्याबाबत लाभार्थ्याच्या तक्रारी येत असल्याचा महत्वाचा मुद्दा सभेत उपस्थित केला.यावर तहसीलदारांनी वरोरा तालुक्यातील सर्व लाभार्थ्याचे माहे मे 2021 पर्यंतचे अनुदान आहे.एप्रिल 2021 मध्ये पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्याचे अनुदान ओरियंटल बँकेचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाल्याने तांत्रिक अडचणीमुळे वेळेत जमा झाले नाही.त्यामुळे सदर लाभार्थ्याचे अनुदान वेळेत जमा होण्याकरिता ऑक्सिस बँकेत खाते उघडले असून यापुढे लाभार्थ्याचे अनुदान मंजूर होताच प्रत्यक्ष लाभार्थ्याचे खात्यात सात दिवसाचे आत जमा होईल असे सांगितले आहे.
नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 1 लाख रु.आर्थिक मदत देण्याचे शासन जी आर मध्ये असून,कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 1 लाख रु.आर्थिक मदत देण्याचे शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात यावा.असा संजय गांधी निराधार समितीने ठराव करून तहसीलदारांना देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा असे सुचविण्यात आले.
सभेकरिता समितीचे अध्यक्ष मिलिंद मनोहरराव भोयर,तसेच सदस्य सर्वस्वी
विशाल मारोती बदखल, अविनाश गोपाळा ढेंगळे, दिवाकर दादाजी निखाडे, लक्ष्मण देवराव ठेंगणे,वसंतराव रघुनाथ गायकवाड,श्रीमती यशोदा वसंतराव खामनकर,व तसेच अशासकीय सदस्य सचिव प्रशांत बेडसें पाटील,गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार (स ग्रा.यौ) मधुकर काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
समिती सभेच्या यशस्वीतेसाठी अ का संजय गांधी योजना सूर्यकांत पाटील,लिपिक मधुकर दडमल,लिपिक पदमा लाकडे ,यांचे योगदान लाभले.
आभारप्रदर्शन मधुकर काळे नायब तहसीलदार यांनी केले.