Breaking News

वर्धेत भाजपला धक्का;हिंगणघाट नगरपरिषदचे १२ भाजपा नगरसेवकांचा मुंबईत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बांधले शिवबंधन

संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचा पुढाकार

वर्धा:सचिन पोफळी :-
हिंगणघाट नगरपरिषदचे १२ भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश घेतला. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे सोबत भाजपा नगरसेवक मागील सहा महिन्यांपासून संपर्कात होते.कोविड काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपा नगरसेवकांच्या प्रवेशा संदर्भात चर्चा करण्यात आली होती तेव्हापासून सर्व नगरसेवक अनंत गुढे यांच्या संपर्कात होते. कोविड मुळे असलेली संचारबंदी उठताच हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे सहित ९ भाजपा नगरसेवक व २ माजी नगरसेवक यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री यांचे वर्षा निवासस्थानी उध्दव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला.यावेळेस शिवसेना विदर्भ समन्वयक श्री. प्रकाशजी वाघ जिल्हाप्रमुख अनिल देवतारे व प्रशांत शहागडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाधिकारी अभिनंदन मुनोत यांची उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *