भूमिपुत्रांनाच देशी,विदेशी दारूचे परवाने देण्याची मागणी.(सुधाकर ताजणे)
कोरपना ता.प्र.:-
महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी केली.आता ६ वर्षांनंतर महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून परवाने नूतनीकरण करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता नव्याने देणारे देशी,विदेशी व शापीचे परवाने फक्त भूमिपुत्रांनाच द्यावे या प्रमुख मागणीसह इतर पाच मागण्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना कोरपना तालुकाध्यक्ष सुधाकर ताजणे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही यासंबंधीचे निवेदन पाठवण्यात आले आहे.
१)महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून जी व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असतील अशा नागरिकांना देशी, विदेशी व शापीचेः परवाने देण्यात यावे. २)परप्रांतीय नागरिक जे पुर्वी अवैध दारूविक्री करत होते.नंतर वैध परवाना धारक बनले अशांचे नवीन किंवा जूने परवाने पुणर्विलोकन करू नये,यांना कायम दारू दुकानांचे परवाने देण्यात येवू नये.याचे कारण की यातील काही त्या,त्या प्रांतातील स्वस्त दारू आयात करून जिल्ह्यात जास्त दराने विक्री करतात व भरमसाठ नफा कमवतात.३)पुर्वीचे काही दारू दुकाने नागरी वस्तीत,शाळा,रुग्णालयाच्या जवळ होते.ती दुकाने कायम स्वरूपी बंद ठेवण्यात यावी.जर त्यांना नव्याने परवानगी द्यायची असेल तर त्यांची दुकाने नागरी वस्तीत, धार्मिक स्थळे,शाळा, रुग्णालयापासून कमीत कमी हजार मिटर दूर लावण्याची परवानगी द्यावी. ४)दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ११ आणि बंद करण्याची रात्री ८/३० अशी ठेवण्यात यावी.निर्धारितौ वेळेचा भंग झाल्यास पहिल्यांदा १ लाख,दुसऱ्यांदा २ लाख व तिसर्यांदा परवानेच रद्द करण्याची कारवाई करावी.५)दारूच्या बॉटलांवर क्यु.अर.कोड देण्यात यावा,त्यावर निर्माता,वैधता,मूळ किंमत इत्यादी विषयी संपूर्ण माहिती उपलब्ध असावी. अशाप्रकारच्या मागण्या ताजणे यांनी निवेदनात नमूद केले असून याविषयी सकारात्मक विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.आता शासनप्रशासन ताजणे यांच्या मागणीकडे लक्ष देतील का! हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.